उद्या रेल्वे स्थानकावर ढोल-ताशांच्या गजरावर होणार स्वागत
भुसावळ- माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांना भोसरी प्रकरणात एसीबीने क्लीनचीट दिल्यानंतर खडसे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. क्लीनचीट नंतर खडसे यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन झाल्याने गेल्या काही दिवसांपासून ते मुंबईतच होते. 11 रोजी ते जिल्ह्यात परतत आहेत. शुक्रवारी पहाटे सहा वाजता दादर-अमृतसर एक्सप्रेसने त्यांचे भुसावळात आगमन होत असल्याने ढोल-ताश्यांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीने त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
हितचिंतकांना उपस्थितीचे आवाहन
परीसरातील सर्व भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी व नाथाभाऊंवर प्रेम करणार्या हितचिंतकानी भुसावळ रेल्वेस्थानकावर स्वागतासाठी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा संघटण सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, महिला आघाडी अध्यक्ष शैलजा पाटील, पंचायत समिती सभापती सुनील महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, पालिका गटनेते हाजी मुन्ना तेली, वरणगाव गटनेते बबलू माळी, तालुका सरचिटणीस भालचंद्र पाटील, नारायण कोळी, शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, सरचिटणीस रमाशंकर दुबे, पवन बुंदेले, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, नगरसेवक युवराज लोणारी, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सुमित बर्हाटे, भाजयुमो शहराध्यक्ष अनिकेत पाटील, भुसावळ शहर संयोजक सोशल मीडिया नंदकिशोर बडगुजर यांनी केले आहे.