चाळीसगाव : राज्याचे माजी मंत्री व जिल्ह्याचे भाजपा नेते आमदार एकनाथराव खडसे यांचा रविवारी 2 रोजी चाळीसगाव येथे माजी केंद्रीय मंत्री एम.के.अण्णा पाटील यांच्या निवासस्थानी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कैलास सूर्यवंशी यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्या निमित्त खडसे हे चाळीसगावी आले होते.
या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री एम.के.अण्णा पाटील, माजी आमदार साहेबराव घोडे, किसनराव जोर्वेकर, वडीलाल भाऊ राठोड, रवींद्र पाटील, के.बी.साळुंखे, नानाभाऊ पवार, शेषराव पाटील, यु.डी.माळी, राजेंद्र राठोड, सूर्यभान घोडे, संजय घोडे, उत्तमराव महाजन, गफूर पहेलवान, बंडू पगार, राजू मांडे, राजू पगार, मनोहर सूर्यवंशी, राकेश नेवे, अरुण पाटील, स्वप्नील मोरे, विवेक चौधरी यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.