नंदुरबार । काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आदिवासी समनव्य समितीच्या वतीने करण्यात आली आहे. पद्माकर वळवी यांनी शहादा तालुक्यात एका जाहीर कार्यक्रमात आदिवासी टोकरे कोळी समाजाबद्दल बेताल वक्तव्य केले आहे. त्यामुळे टोकरे कोळी समाज संतप्त झाला असून आंदोलनाची दिशा ठरविण्यात येत आहे. काल बुधवारी नंदुरबार येथे या समाजाची बैठक घेण्यात आली. धुळे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी टोकरे समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते. पद्माकर वळवी यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषध व्यक्त करण्यात आला. संविधानाला आव्हान देणारे माजीमंत्री पद्माकर वळवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.याबाबत जिल्हाधिकार्यांना निवेदन देतांना डॉ. राजेंद्र सावळे, आकाश कोळी, विजय शिंदे, अमोल कोळी, शरद शिरसाठ, हेमंत सूर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते. कारवाई न झाल्यास महाराष्ट्रभर आंदोलन केले जाईल, असा इशारा ही देण्यात आला आहे.