माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी माफी मागावी

0

दोंडाईचा । शहादा तालुक्यातील चांदसैली येथे जाहीर सभेत माजीमंत्री पद्माकर वळवी यांनी कोळी ढोर व ठाकूर या संपुर्ण अनुसुचित जमातींची ’नकली व खोटे’ म्हणून जाहीर बदनामी व मानहानी केली. संविधानाचा अनादर करणारे भाष्य केल्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी आदिवासी कोळी समाज समन्वय समितीतर्फे तहसिलदार यांच्याकडे करण्यात आली आहे. पद्माकर वळवी यांनी जाहीर माफी मागावी आदिवासी कोळी समाजाची मागणी टोकरे कोळी व ठाकूर या अनुसुचित जमातीच्या बांधवांच्या दुखावलेल्या भावनांचा अतिशय गांभीर्याने विचार करून कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

यावेळी प्रकाश कोळी, वसंत कोळी, संतोष कोळी, नगरसेवक नरेंद्र कोळी, युवा मार्गदर्शक मनोज कोळी, अमोल कोळी, अनिल जाधव, मंगल कोळी, मुकेश कोळी, योगेश कोळी, धनराज कुवर, मयुर कोळी, प्रदीप कोळी यांनी दिला आहे.