माजी मंत्री पाटील यांच्याहस्ते नाला, बंधार्‍यांच्या कामांचे उद्घाटन

0

धुळे । तालुक्यातील आमड शिवारात नाला व बंधारा जवाहर सामाजिक कृतमला ट्रस्टच्या सहकार्याने खोलीकरण आणि गाळ काढण्याचा कामाला माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली. आंमदड, मिरडोण, मुकटी, मिरडाई, अंचाळे, चिंचखेडा या भागात जवाहर सामालिक कृतत्मता ट्रस्ट सहकार्यांने जल सिंचनाची चळवळ तालुक्यात राबविली जात आहे.

आमदड शिवारातील आसण्या या उपनाल्याचे व त्यातील बांधार्‍याचे खोलीकरण कामाला सुरूवात करण्यात आली. तालुक्यातल आमदड, भिरडाई, भिरडाणे, अंचादे व मुकटी परिसरातून कान्हेरी नदी वाहते. वजिर सेंडे येथील उगमापासून तर मुकटीपर्यंत 25 आणि उपनाल्यांवर 71 से एकूण 96 बंधारे आहेत. या नदी क्षेत्रात वंजीरखेडा, आयडे, अंयाडे, चिंचखेडा, यासर्व मिरडोण मुकटी ही गाव यातात. मुकटी पर्यंत करावयाची कन्हेरी नदीची एकूण लांबी साडे बारा किमी आहे. या नदीचे त्यातील बंधाराच्या रूंदीकरण आणि खोलीकरण झाल्यानंतर त्यात 17 अब्ज 50 कोटी लिटर एवढा पाणी साठा आडविता येणार आहे. याप्रसंगी माजी मंत्री रोहिदास पाटील, समाज कल्याण सभापती मधुकर गर्दे, बाजीराव पाटील, कृषी उत्पन्न उपसभापती रितेश पाटील, भगवान गर्दे, सुनील मराठे, छोटु चौधरी, दिनेश भदाणे, आंमदड्याचे सरंपच रोहिदास मराठे, सवानी तांडा सरपंच नानाजी पाटील, अभियंता ए.बी. पाटील, हरीभाऊ जाधव, सरपंच राजीव पाटील, नामदेव पाटील, प्रदिप पाटील, माणिक मराठे, अनिल पवार यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.