भाजपाचे आमदार डॉ.विजयकुमार गावीत ; धनगरांना आदिवासींच्या सवलती नाहीच
नंदुरबार- धनगर आरक्षणाचा बाहू करून आदिवासींमध्ये गैरसमज पसरविणारे काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी व आमदार के.सी.पाडवी यांनी आदिवासींच्या विकासासाठी काय केलं ?असा सवाल भाजपाचे आमदार डॉ.विजयकुमार गावित यांनी पत्रकार परीषदेत उपस्थित केला. धनगरांना कोणत्याही प्रकारे आदिवासींच्या सवलती दिल्या जाणार नसून पूर्वी त्यांच्या ज्या सवलती होत्या त्यातूनच लाभ मिळण्याची तरतूद करण्यात येणार आहे, असा खुलासा देखील आमदार डॉ.गावीत यांनी केला आहे. खासदार हिना गावित व आमदार विजयकुमार गावित यांनी धनगर सवलती प्रश्नावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची नुकतीच भेट घेऊन चर्चा केली. त्याचा खुलासा करण्यासाठी आमदार डॉ.विजयकुमार गावित यांनी गुरुवारी वाजता शासकीय विश्रामगृहात पत्रकार परीषद घेतली.