माजी मंत्री शरद पवार 16 रोजी पाचोरा व भडगाव शहरात

0

पाचोरा – राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे येत्या १६ सप्टेंबर रोजी पाचोरा येथे येत असून त्यांच्याहस्ते विविध कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. पाचोरा येथे डॉ. भूषण मगर यांनी विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल थाटले असून त्याचे उद्घाटन व लोकार्पण तसेच पाचोरा तालुका शिक्षण संस्थेच्या भडगाव येथील महाविद्यालय इमारतीचे उद्घाटन येत्या १६ सप्टेंबर रोजी शरद पवार यांच्याहस्ते होणार आहे.

कार्यक्रमासाठी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप वाघ यांनी दिल्ली येथे जाऊन शरद पवार यांना निमंत्रण दिले. पवार यांनी निमंत्रण स्वीकारले असून त्यांच्यासोबत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे देखील येणार असल्याचे सांगण्यात आले. दिल्ली येथे गेलेल्या शिष्टमंडळात दिलीप वाघ, डॉक्टर भूषण मगर, नगरसेवक नाना देवरे, जगदीश सोनार, प्रकाश भोसले, रणजीत पाटील, शरद वारुळे यांचा समावेश होता. शरद पवार यांच्या दौऱ्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात आनंद व उत्साह निर्माण झाला असून पदाधिकारी व कार्यकर्ते तयारीला लागले आहे.