जळगाव: माजी मंत्री सुरेश जैन यांची प्रकृती आज गंभीर झाली आहे. प्रकृती गंभीर असल्याने सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची चर्चा होत होती, मात्र या सर्व बातम्या म्हणजे अफवा असल्याची माहिती सुरेशदादा जैन यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी तुरुंगात असताना सुरेशदादा जैन यांच्या प्रकृतीत बिघाड झाला होता. त्यानंतर त्यांना मुंबईतील जे.जे.रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज दुपारी अचानक whatsappगृपमध्ये सुरेश दादांचे निधन झाले असल्याची माहिती व्हायरल झाली. हे वृत्त सुरेशदादा यांचं निकटवर्तीयांनी फेटाळून लावले आहे. मात्र असे असले तरी सुरेशदादा जैन यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना मुंबईतील जे.जे.रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.