लखनौ- उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचा सरकार असतांना २०१२-१६ दरम्यान अवैध उत्खनन घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची सीबीआय चौकशी होण्याची शक्यता आहे.
२०११ नंतरचे उत्तर प्रदेशमधील सर्व खनिकर्म मंत्री सीबीआय चौकशीच्या रडारवर आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, गायत्री प्रसाद प्रजापति आणि रमेश मिश्रा यांची चौकशी होऊ शकते. काल आयएएस अधिकारी पी.चंद्रकला यांच्या निवासस्थानी चौकशी करण्यात आली होती.