नवी दिल्ली:उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायणदत्त तिवारी यांचा पुत्र रोहित शेखर याचा आज दिल्लीतील मॅक्स साकेत रुग्णालयात मृत्यू झाला. ही माहिती दक्षिण दिल्लीचे डीजीपी विजय कुमार यांनी दिली. एन.डी. तिवारी हे आपले जैविक पिता आहेत, असा दावा करत न्यायालयात धाव घेतल्याने रोहित शेखर चर्चेत आला होता. अखेरीस न्यायालयाने रोहित याचा दावा मान्य केल्यानंतर एन. डी. तिवारी यांनी त्याचे पितृत्व स्वीकारले होते.