माजी मुख्यमंत्री कै.नाईक यांची जयंती साजरी

0

शहादा । येथील वसंतराव नाईक शैक्षणिक संकुलात आज रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली. संस्थेचे विभागीय सचिव व बंजारा सेवा कर्मचारी संघाचे सरचिटणीस प्रा. संजय जाधव यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी समन्वयक संजय राजपुत वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष महाले,उपप्राचार्य आर. जे. ऱघुवंशी,पर्यवेक्षक सुनिल सोमवंशी, शारदा कन्या विद्यालयाचा मुख्याध्यापिका सैय्य्द मॅडम,पर्यवेक्षक एम. बी. मोरेसह शिक्षक प्राध्यापक उपस्थित होते.

शिवाय मान्यवरांच्या उपस्थित विद्यालयाचा क्रिडा संकुलात स्काउटचा शिक्षक व विद्यार्थ्यानी वृक्षारोपण केले.यावेळी समनवयक संजय राजपुत यानी बोलताना कै. वसंतराव नाईक हे राज्याचे महानायक होते. कृषी क्रांतीचे जनक होते त्यांचा आदर्श सर्वानी घ्यावा. त्यानी शेतकरी कसा सुखी होईल यासाठी जिवन समर्पीत केले असे सांगितले. सुत्रसंचालन व आभार बी.व्ही.खानोरे यानी यानी मानले.