भुसावळ । माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस कमिटीतर्फे अभिवादन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष मो. मुनव्वर खान, जिल्हा उपाध्यक्ष जे.बी. कोटेचा यांनी प्रतिमापूजन केले. सलीम गवळी यांनी नाईक यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. नाईक यांच्या कार्यकाळात झालेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
भुसावळचे माजी आमदार नीळकंठ फालक, राजेंद्र पटेल, दीपक जैन, यु.एल.जाधव, विवेक नरवाडे, महेबूब खान, अन्वर खान, सायरा बानो, यास्मीन बानो, प्रदीप नेहेते, कल्पना तायडे, विनोद राठोड, अॅड. एम.एस. सपकाळे, आर.बी. भवार आदी उपस्थित होते.