मुंबई: माजी मुख्यमंत्री तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाची (इन्कम टॅक्स) नोटीस देण्यात आली आहे. आयकर विवरण देण्याबाबतची नोटीस मिळाल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान आपण आयकर विभागाला रीतसर उत्तर देणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. भाजप सरकारकडून हेतुपुरस्सर कॉंग्रेसच्या नेत्यांना त्रास दिला जात असल्याचे आरोपही आता यातून होऊ लागले आहे.
यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील इन्कम टॅक्सची नोटीस देण्यात आली होती, त्यावरून राजकारण तापले होते. आता पृथ्वीराज चव्हाण यांना नोटीस मिळाल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.