माजी मुख्यमंत्री रमन सिंग यांच्या सचिवांना अटक

0

बिलासपुर: छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमन सिंग यांचे खाजगी सचिव ओ.पी. गुप्ता यांना अटक करण्यात आली आहे. गुप्ता यांनी एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ आणि ५०६ आणि पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचार पिडीत मुलगी मुख्यंमंत्र्यांचे सचिव ओ. पी. गुप्ता यांच्या घरी राहत होती.

नुकतीच छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणूक झाली असून, छत्तीसगड मध्ये कॉंग्रेसचे सरकार आले आहे. ओ. पी. गुप्ता यांना अटक झाल्यामुळे माजी मुख्यमंत्री रमणसिंग पुन्हा एकदा अडचणीत आले आहे. छत्तीसगड मध्ये रमन सिंग यांच्या काळात भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते.