नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश राजिंदर सच्चर यांचे शुक्रवारी निधन झाले. ते 94 वर्षाचे होते. देशातील मुस्लिमांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सच्चर यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली होती. सच्चर समिती म्हणून ही समिती ओळखली जाते. गेल्या काही दिवसांपासून राजिंदर सच्चर आजारी होते. त्यांना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. भारतातील मुस्लिमांची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती जाणून घेण्यासाठी 9 मार्च 2005 रोजी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. सच्चर हे या समितीचे प्रमुख होते. सच्चर यांच्या नावानेच ही समिती ओळखली जाते.