माजी मॉडेल बनणार ट्रम्प यांची संपर्क प्रमुख

0

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड यांनी एका माजी मॉडेलला प्रमुख संपर्क संचालकपदी नियुक्त केले आहे. जानेवारी महिन्यात सू्त्रे हाती घेतल्यापासून या पदावर त्यांनी केलेला हा तिसरा फेरबदल आहे.

हिक्स होप असे या पूर्वाश्रमीच्या मॉडेलचे नाव असून, ती अनेक वर्षांपासून ट्रम्प यांच्याशी संबंधित आहे, अशी माहिती देण्यात आली तसेच हिक्स होप ही सरकारमधील सर्वाधिक पगार मिळणार्‍यांपैकी एक असणार आहे. सध्या 28 वर्षांची असलेल्या हिक्सने मॉडेलिंगमधून करिअर सुरू केले होते. वयाच्या 11व्या वर्षीच राफ लॉरेनसारख्या अनेक प्रसिद्ध ब्रँड्ससोबत हिक्सने काम केले आहे.

हिक्स 2012 साली ट्रम्प यांच्या संपर्कात आली आणि दोघांनी मिळून काम केले. त्यावेळी ती एका जनसंपर्क संस्थेशी संबंधित होती आणि ही कंपनी ट्रम्प यांची मुलगी इवान्का ट्रम्प चालवत होती. त्यानंतर 2014 साली हिक्सने ट्रम्प ऑर्गनायझेशनसोबत पूर्णवेळ काम करण्यासाठी नोकरी सोडली होती आणि याच कंपनीसाठी तिने मॉडेलिंगही केली. जानेवारी 2017 मध्ये फोर्ब्स नियतकालिकाने ‘अंडर-20अचिव्हर्स’मध्ये तिचा समावेश केला होता.