माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना कोरोनाची लागण

0

नवी दिल्ली: संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. सामान्य नागरिकांपासून सेलीब्रेटी, राजकीय नेते देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. आता भारतरत्न पुरस्काराने सन्मानित माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वत: याबाबत ट्वीटकरून माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. प्रणव मुखर्जी यांनी रुग्णालयात गेले असता करोना चाचणी केली होती. यावेळी त्यांना करोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले.

प्रणव मुखर्जी यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “आपण एका दुसऱ्या कारणासाठी रुग्णालयात गेलो होतो. यावेळी मला करोनाची लागण झाल्याचे समोर आले. गेल्या आठवड्याभरात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी कृपया स्वत:ला विलगीकरणात ठेवावं तसंच आपली कोविड चाचणी करावी अशी विनंती आहे”.

कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच आहे. २ ऑगस्टला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. अमित शहांवर सध्या उपचार सुरु आहे.