जळगाव– शहरातील डॉ़ अण्णासाहेब जी़डी़ बेंडाळे महिला महाविद्यालयात माजी विद्यार्थीनी संघ आणि जन बँक यांच्या संयुक्त विद्यामाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला़ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ एस़एस़राणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले़ .
याप्रसंगी उपप्राचार्य बी़पी़ सावखेडकर, उपप्राचार्या रत्ना महाजन, माजी विद्यार्थीनी समिती प्रमुख प्रा़ मनिषा पाटील, प्रा़ नंदा बेंडाळे, प्रा़ संध्या फेगडे, डॉ़ इनामदार, रूपाली सरवदे, गायत्री जोशी, सागर चव्हाण, नितीन अहिरे, माजी विद्यार्थीनी रंजना पाटील, मिनल पाटील, शिल्पा सुराणा, उज्ज्वला खडके, नुरी तडवी आदी मान्यवर उपस्थित होते़