खडकी : खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालातील सायन्स, आर्टस अॅन्ड कॉमर्स विभागातील सर्व माजी विद्यार्थ्यांनी मिळून माजी विद्यार्थी संघटना स्थापन करण्यात येणार आहे.
महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी समाजातील विविध क्षेत्रात नावारूपास आले आहेत, ही परंपरा आजही कायम आहे. परंतु ज्या महाविद्यलयात किंवा शाळेत आपण शिकलो त्याच्याविषयी आस्था वाटणे आणि ती दर्शवणेही महत्त्वाचे आहे. शिक्षकांनी केलेल्या संस्कारांमुळे विद्यार्थी घडतो, त्यामुळे शिक्षकांप्रती व शाळेप्रती कृतज्ञ राहणे, हे विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे. याच उद्देशाने ही संघटना स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी माजी विद्यार्थ्यांनी 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी करणे आवश्यक असून विद्यार्थ्यांनी आपले नाव आणि मोबाईल क्रमांक राजेश माने यांच्या 9881066795 या मोबाईल क्रमांकावर, तसेच ीरक्षारपश111सारळश्र.लेा या मेल आयडीवर पाठवावे असे आवाहन माजी विद्यार्थ्यांकडून करण्यात आले आहे.