पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे आज (शनिवारी) सकाळी चिंचवड येथील खासगी रुग्णालयात निधन झाले आहे.
दत्ता साने चिखली परिसरातून राष्ट्रवादीकडून तीनवेळा ते निवडून आले होते. लॉकडाउन कालावधीत त्यांनी नागरिकांना मोठी मदत केली. अन्नधान्यांचे वाटप केले होते. यामुळे त्यांचा प्रत्यक्ष नागरिकांशी नियमित संपर्क येत होता. साने यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात सर्वानाच धक्का बसला असून हळहळ व्यक्त केली जात आहे.