माजी सरपंच पतीस जातीवाचक शिवीगाळ, वरणगाव पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा

0
वरणगाव :- सरपंच पतीस जातीवाचक शिवीगाळ करून धमकावल्याप्रकरणी वरणगाव पोलिसात पिंपळगाव खुर्दच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
घरकुलाच्या मंजुरीची शिफारस पाठवीत नसल्याने माजी सरपंच वत्सलाबाई हरी भिल यांचे पती हरी सिताराम भील (55) यांना संशयीत आरोपी सुरेश ईश्वर राजपूत (35) व विलास काशिनाथ राजपूत (35) यांनी मद्यधूंद अवस्थेत जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण केली. तपास मुक्ताईनगरचे पोलिस उपविभागीय अधिकारी सुनील नेवे  करीत आहेत.