जळगाव। भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगराची बैठक नुकतीच भाजपा जिल्हा कार्यालयालयात जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत माजी सैनिकांच्या वैयक्तिक व सामाईक अडचणींवर चर्चा करण्यात आली यात शासनाचे परिपत्रक असल्यावर सुद्धा जळगाव मनपा शहर माजी सैनिकांचे घरपट्टी माफ करणेबाबत विचार करत नाही.
तरी याबाबत जिल्हाधिकारी यांचेशी स्वतः भेटून माजी सैनिकांचे प्रश्न व अडचणी सोडविणार असल्याचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांनी आश्वासन दिले. तसेच जिल्हातील सर्व माजी सैनिकांना त्यांच्या तक्रारी व सूचना देण्यात याव्यात त्या पक्षाच्या वतीने सोडविण्यात येतील असे आव्हान आमदार सुरेश भोळे यांनी केले. यांनतर माजी सैनिक आघाडीची कार्यकारणी जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांनी जाहीर केली. याप्रमाणे प्रसंगी माजी सैनिक आघाडी अध्यक्ष चंद्रकांत डी.पाटील, उपाध्यक्ष विलास पाटील, सचिव एस.बी.सुरडकर, सुतेज चौधरी, ए.एस.इंगळे, सी.के.देशमुख, एन.टी.पाटील उपस्थिती होती. यावेळी माजी सैनिकांबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली होती.