माजी सैनिकांच्या पाठपुराव्याला यश रुग्णालय उभारणार

0

जळगाव। शहरातील महाबळ रोडवरील सैनिक भवनात सैनिकां सोबतच त्यांच्या कुटुंबीयांसाठी येणार्‍या वर्षभरात एक भव्य रुग्णालय उभारले जाणार आहे. या रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी पार पाडण्यात आला असून माजी सैनिक अंशदायी स्वास्थ्य योजनेंतर्गत हे बांधकाम केले जाणार आहे.

गेल्या 12 वर्षांपासून रुग्णालयासाठी संरक्षण मंत्रालयाकडे जिल्ह्यातील माजी सैनिकांचा पाठपुरावा सुरू असताना त्याची दाखल घेत या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली करण्यात आली असून लवकरच प्रत्यक्षात कामास सुरुवात होणार आहे. मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस च्या माध्यमातून सैनिकाच्या रुग्णालयाचे काम करण्यात येणार आहे. कामाचे भूमिपूजन भुसावळ मिलिटरीचे ब्रिगेडीयर अनुराग वीज यांनी कुदळ मारून केले. माजी सैनिकांसह सैनिक त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्याच्या सुविधा या रुग्णालयात मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी कर्नल संजीव सिंग, सुनील कदम, मेजर बिकाश सिंग, निवृत्त कर्नल आशुतोष मुखर्जी, मुख्य अभियंता कमर हसन, गालीब हुसेन उपस्थित होते. माजी सैनिकांनी पाठपुरावा केल्याने त्याचे कौतुक देखील करण्यात आले आहे. रुग्णालय सुरु झाल्यास त्याचे सर्व श्रेय हे माजी सैनिकांना असणार असे उपस्थित मान्यवरांनी बोलून दाखविले आहे.