माजी सैनिकांसाठी 28 जुलैला तालुकास्तरीय समितीच्या बैठकांचे आयोजन

0

धुळे। जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा त्यांचेवर अवलंबितांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समितीच्या बैठकींचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने संबंधित तालुक्यातील सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा व अवलंबितांनी त्यांच्या अडीअडचणी असल्यास दोन प्रतीत अर्ज तहसिलदार यांचेकडे सादर करावे.

सन 1986 पूर्वी सैन्यसेवेतुन निवृत्त झालेल्या माजी सैनिकांनी कुटूंब निवृत्ती वेतनाकरिता पत्नीचे नाव अद्याप पी.पी.ओ. पेन्शन पेमेन्ट ऑर्डर मध्ये समाविष्ठ केले नसल्यास त्यांनी तात्काळ पत्नी सोबत काढलेले तीन संलग्न फोटो, पेन्शन पासबुक ची प्रत घेवून उपस्थित रहावे. शुक्रवार 28 जुलै, 2017 रोजी तहसिल कार्यालय, शिरपूर येथे सकाळी 11.30 वाजता तर दुपारी 03.30 वाजता तहसिल कार्यालय, शिंदखेडा येथे या बैठकांचे आयोजन करण्यात आले असून संबंधित तालुक्यातील गरजूनी उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी दि.च.बागुल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.