चाळीसगाव। तालुक्यातील वडाळा – वडाळी येथे माजी सैनिकाला व त्याच्या परिवाराला गावातीलच 2 महिलांसह 6 जणांनी मारहाण केली असून माजी सैनिकाच्या पत्नीने अंगणात गहू सुकवण्यास ठेवले होते. त्यावर शेजारीच टाईल्स बसवण्याचे काम सुरु असतांना घाण उडाल्याचा जाब विचारल्यावरून हि मारहाण सोमवार 3 एप्रिल रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडाळा – वडाळी ता चाळीसगाव येथील माजी सैनिक रघुनाथ सुकदेव पाटील (63) यांच्या पत्नी सरलाबाई पाटील यांनी सोमवार 3 एप्रिल रोजी त्यांच्या अंगणात गहू सुकवण्यासाठी टाकले होते. शेजारीच राहणारे सुभाष रामदास पाटील यांचे घरी टाईल्स बसवण्याचे काम सुरु असतांना त्याची घाण गव्हावर उडाल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी सरलाबाई पाटील गेल्याचा होत्या. याचा राग येऊन व त्याचे वाईट वाटून सुभाष रामदास पाटील, दिलीप रामदास पाटील, सोनू उर्फ रवींद्र सुभाष पाटील, सतीश सुभाष पाटील, राहुल सुभाष पाटील, भूषण दिलीप पाटील व 2 महिला रा वडाळा – वडाळी ता चाळीसगाव यांनी त्यांना व त्यांच्या परिवाराला शिवीगाळ करून मारहाण केली. आम्ही तुम्हाला मारून टाकू अशी धमकी देऊन फिर्यादी रघुनाथ पाटील यांच्या पत्नी सरलाबाई, भाऊजई, मुलगा व भावाला मारहाण केली. त्याच प्रमाणे दोन्ही आरोपी महिलांनी त्यांच्या पत्नीला व भाऊजईला मारहाण केली. भूषण पाटील याने त्यांचे भाऊजईच्या पायावर दगड मारून दुखापत केली. सुभाष पाटील याने त्यांचा मुलगा संदेश याच्या डोक्यावर दगड मारून दुखापत केली आहे. या मारहाणीत छायाबाई भरत पाटील, सरलाबाई रघुनाथ पाटील व संदेश रघुनाथ पाटील हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी रघुनाथ पाटील यांचे फिर्यादीवरून वरील 8 आरोपींविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार किशोर पाटील करत आहेत. यातील सुभाष रामदास पाटील, दिलीप रामदास पाटील, सोनू उर्फ रवींद्र सुभाष पाटील, सतीश सुभाष पाटील, राहुल सुभाष पाटील, भूषण दिलीप पाटील यांना अटक करण्यात आली आहे .