माजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

0

मुंबई: भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांच्यावर चाळीसगाव तालुक्यातील एका माजी सैनिकाला मारहाण केल्याचे आरोप करण्यात आले आहे. याबाबत भाजपचे सरकार असतांना वारंवार तक्रार करूनही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. दरम्यान आता गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी चौकशीचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.  जळगावचे पोलीस अधीक्षक यांना चौकशीचे आदेश दिले आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

२०१६ मध्ये तत्कालीन आमदार उन्मेश पाटील यांनी माजी सैनिक सोनू महाजन यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केल्याचे आरोप महाजन कुटुंबीयांनी केले. त्यांनी याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, मात्र भाजप सरकारच्या काळात गुन्हा दाखल झाला नाही. शेवटी महाजन कुटुंबीयांनी न्यायलयात धाव घेतली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांच्यावर नौदलाचे माजी सैनिक मदन शर्मा यांनी  व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली होती, त्यानंतर शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आली. याप्रकरणावरून शिवसेनेवर टीका होत आहे. दरम्यान आता महाविकास आघाडी सरकारने २०१६ चे प्रकरण पुढे काढत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.