मुंबई : श्री देवींसोबतचे अर्जूनचे संबंध चांगले नसून देखील श्रीदेवी यांच्या निधनानंतर अर्जून कपूरने बहिण जान्हवी आणि खुशीला कोणत्याही परिस्थितीत एकटं सोडलं नाही. भाऊ म्हणून तो कधीच कमी पडला नाही, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. एका मुलाखतीदरम्यान अर्जूनने खुशी आणि जान्हवीसोबतच्या आपल्या नात्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.
आमच्या कुटुंबात कोणताही वाद नाही, मात्र आमचं कुटुंब हसतंखेळतं असल्याचा दिखावाही आम्ही करत नाही. माझ्या वडिलांसाठी मी नेहमीच एक चांगला मुलगा असण्याचा प्रयत्न केला आहे. माझं कुटुंब आणि माझ्या बहिणी नेहमीच आनंदात असाव्यात, अशी माझी इच्छा असल्याचे सांगत अर्जूनने जान्हवी आणि खुशीसोबतचे आपले नाते दिवसेंदिवस अधिक दृढ होत असल्याचे म्हटले. कॉफी विथ करण या चॅट शोमध्येही ही भाऊ बहिणीची जोडी लवकरच एकत्र झळकणार आहे.