अमळनेर :- येथील माझं गाव माझं अमळनेर या सोशल मीडियातील व्हाट्सअॅप ग्रुप तर्फे विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी केलेल्या फक्त सहा गुणवंतांचा सत्कार मंगळग्रहावर आज स १० वाजेला संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगळग्रह सेवा संस्थांचे अध्यक्ष डिगंम्बर महाले तर प्रमुख पाहुणे उपविभागीय पोलिस अधिकारी रफिक शेख होते.प्रास्ताविकात रणजित शिंदे यांनी हा ग्रुप अमळनेर विषयी ऋण व्यक्त करणारा असून या ग्रुपने समाजात सामाजिक कामाच्या माध्यमातून मोठा आदर्श निर्माण केला आहे.डॉ राजेंद्र पिंगळेंनी सर्वसमावेशक व नवनवीन उपक्रम करणारा ग्रुप असे म्हणत मनोगत व्यक्त केले तर चोपड्याचे पालिका प्रशासन अधिकारी भाऊसाहेब देशमुख यांनी या ग्रुप मध्ये मनाने तरुण असल्या सारखे भासते असे म्हटले.
कार्यक्रमात गुणवंतांचा पुष्पगुच्छ व ग्रुप तर्फे मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.यात शिकागो येथे एम एस परीक्षेत प्रथम आलेले पियुष प्रकाश शिरोडे,एम पी एस सी परीक्षेत ओ बी सी प्रवर्गातून राज्यात प्रथम आलेला स्वप्नील वानखेडे,नीट परीक्षेत जिल्ह्यात दुसरा आलेला उदय संजय पाटील,१२वी मध्ये तालुक्यात प्रथम आलेली पायल संजय बडगुजर,१० वी मध्ये तालुक्यात प्रथम आलेली स्नेहल जितेंद्र पवार व गौरव सुनील भोई यांचा सत्कार करण्यात आला.या सत्काराला उत्तर देतांना स्वप्नील वानखेडेंनी अमळनेरातून पहिला आय एस अधिकारी तर स्नेहल पवार हिने इंजिनियर बनण्याचा मानस व्यक्त केला.कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुणे रफिक शेख यांनी ग्रुप चांगला असून प्रत्येक कामांसाठी मानस मदतीचा हात देणारे असल्याचे सांगितले.अध्यक्षीय भाषणात डिगंबर महालेंनी हा ग्रुप म्हणजे सर्व रंगांना जोडणारा धागा असून भविष्यात अनेक विधायक काम करण्याचा मानस असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्र संचलन उदय पाटील तर आभार ग्रुप अॅडमिन सुनील भामरे नी मानले.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास राजेद्रं पोतदार,पकंज मुदंडे ,प्रदीप अग्रवाल,योगेश मुदंडे ,राकेश माहेश्वरी, डाॅ संजय शहा ,सजंय कौतिक पाटील ,दिलीप सोनवणे ,जितेद्रं राणे, अमोल माळी, ईश्वर महाजन,सोमचंद संदानशिव,किरण सावंत,चंद्रकांत महाजन,दिनेश मणियार,प्रवीण महाजन,प्रा सुरेश पाटील,शिवाजी पाटील,जयेश काटे,किरण पाटील,चेतन राजपूत,भटेश्वर वाणी,संजय एकतारे,दीपक चौधरी,श्रीराम चौधरी,योगेश जैन,सजंय वर्मा , पुरुषोत्तम शेटे,संतोष बिऱ्हाडे,जयवंत ढवळे,अविनाश जाधव,ऍड दिनेश पाटील,श्यामकांत पुरकर, विलास सोनवणे , डॉ शरद बाविस्कर,डॉ किरण बडगुजर,डॉ जिजाबराव पाटील,उदय खैरनार,डाॅ सजंय मुसळे, नितीन निळे,योगेश येवले,पी एल मेखा ,सुनिल वाणी ,ऋत्विक भामरे,गणेश चौधरी,राजेंद्र चौधरी,गणेश चौधरी,बिल्डर प्रशांत निकम,ग्रामसेवक दिनेश साळुंखे,गोविंदा बाविस्कर,उमेश धनराळे, हेमंत महाले ,आनंद दुसाने ,शाम पाटील ,जयेश काटे , अनिल वाणी ,सुनिल भोई ,कुदंन पाटील ,जितु ठाकुर राजेद्र चौधरी, हेमंत चौधरी ,राजु देशमुख ,उमेश चौधरी ,वाल्मिक पाटील ,किरण शेटे ,प्रशांत खरोटे ,सुनिल तिरमाळे ,दिनेश करनकाळ सह अनेक सदस्य उपस्थित होते.