मुंबई : बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच दीपिका पादुकोन आता दीपिका पदुकोन सिंह झाली आहे. दीपिकाशी लग्नगाठ बांधल्यानंतर रणवीर जणू आकाशातच आहे. रणवीरच्या बहिणीनं नवविवाहित जोडप्यासाठी दिलेल्या पार्टीमध्ये रणवीर म्हणाला माझं लग्न जगातील सुंदर मुलीशी झाल आहे.
या पार्टीत दीप-वीरचा अतरंगी अंदाज पाहायला मिळाला. यावेळी त्याच्या बाजूला येऊन उभ्या राहिलेल्या दीपिकाची तुलना त्यानं मॅक्सिकन आर्टिस्ट फ्रिडा काहलो हिच्याशी केली. सब्यासाचीनं डिझाइन केलेला लेहंगा परिधान करून स्टेजवर आलेली दीपिका मला फ्रिडासारखीच भासते असंही रणवीर म्हणाला. यावेळी जमलेल्या सर्वांनीच दोघांना भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा दिल्या.