‘माझा तो इशारा खरा ठरला’, मात्र भाजपने आणि माध्यमांनी माझी थट्टा केली: राहुल गांधी

0

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाचे संकट आहे. कोरोनाच्या संकटामुळे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. देशाची अर्थव्यवस्था मंदावस्थेत आहे. सेवा क्षेत्रासह उद्योग संकट आहे. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा सरकारला लक्ष केले आहे. “आर्थिक संकट येणार हे काही महिन्यांपूर्वीच मी म्हणालो होतो. पण, देशाला सत्य परिस्थिती विषयी इशारा दिला म्हणून भाजपा व माध्यमांनी माझी थट्टा केली होती,” अशी टीका राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली. एका इंग्रजी दैनिकांच्या वृत्तपत्राचा हवाला देत राहुल गांधींनी टीका केली आहे.

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. “लघु व मध्यम उद्योग नष्ट झाले आहेत. मोठंमोठ्या कंपन्या प्रचंड तणावाखाली आहेत. बँकाही संकटात आहेत. मी काही महिन्यांपूर्वी आर्थिक त्सुनामी येणार असं म्हणालो होतो. देशाला सत्य परिस्थितीविषयी इशारा दिला होता. पण, त्यावरून भाजपा आणि माध्यमांनी माझी थट्टा केली होती,” असे ट्वीट राहुल गांधींनी केले आहे.