माझा पाठपुरावा सुरूच राहणार

0
भोसरी:आमदार महेश लांडगे म्हणाले की, स्पाइन रस्त्यामुळे त्रिवेणीनगरमधील अनेक मिळकतधारक बाधित झाले होते. 78 जणांची 50 ते 60 मीटर तर 128 मिळकत धारकांची 75 मीटर मिळकत बाधित झाली होती. या नागरिकांना भूखंड मिळण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून पाठपुरावा करत होतो. प्राधिकरणाने प्रथम 500, 750 आणि 1 हजार स्क्वेअर फुटाने जागा देण्याची तयारी दर्शविली होती. परंतु, एवढ्या जागेत घर बांधणे शक्य नव्हते. त्यामुळे 1250 स्केअर फुटाने जागा देण्यासाठी पाठपुरावा केला. त्याला यश आले असून आज 78 बाधितांना जागा मिळाली आहे. उर्वरित बाधित नागरिकांना लवकरच भूखंडाचे वाटप केले जाईल. त्यासाठी माझा पाठपुरावा सुरु आहे.
माजी नगरसेविका अरुणा भालेकर म्हणाल्या की, स्पाइन रस्त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक बाधित झाले होते. त्यांना योग्य प्रमाणात मोबदला मिळण्यासाठी गेल्या पंचवार्षिकमध्ये पाठपुरावा केला होता. आमदार लांडगे यांच्याकडे देखील आमचा पाठपुरावा सुरु होता. त्याला अखेर यश आले असून काही बाधित नागरिकांना प्लॉटचे वाटप करण्यात आले आहे.