नवी दिल्ली: दिल्लीतील रामलीला मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा सुरु आहे. यासाभेने दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणशिंग मोदींनी फुंकले आहे. देशात सध्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर सुरु असलेल्या विरोधावर मोदींनी भाष्य केले. विरोधकांकडून अफवा पसरवून मुस्लीम समुदाय आणि तरुणांची माथी भडकविली जात आहे. अर्बन नक्षलवाद्यांनी देशात अशांतता पसरविण्याचे काम केले आहे. देशाच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले जात आहे. विरोध करण्याचे अधिकार आहे पण सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नका. हवे तर माझा पुतळा जाळा पण देशाच्या सार्वजनिक मालमत्तेला नुकसान करू नका असे आवाहन मोदींनी केले.
कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षाकडून व्होट बँकेचे राजकारण केले जात आहे. भेदभाव करा, फुट पाडा हीच विरोधकांची रणनीती आहे. कुणाचेही नागरिकत्व काढले जाणार नाही. दलित आणि अल्पसंख्यांक समुदायात भ्रम निर्माण केला जात असून त्याला बळी पडू नका असे आवाहनही मोदींनी केले.