मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी ७ रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते मेट्रो मार्ग आणि मेट्रो भवनचे उद्घाटन झाले. यावेळी मोदींनी मराठीत आपल्या भाषणाला सुरुवात केली. भाषणाच्या सुरुवातीला मोदींनी उपस्थितांच्या नावांचा उल्लेख करताना उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘माझा लहान भाऊ’ असा केला.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर आले आहे. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे यांनी या विधानसभा निवडणुकीत राज्यात युतीचीच सरकार येईल असे मोदी आणि फडणवीस यांच्यासमोर सांगितले. यावरून उद्धव ठाकरे यांनी युती होणार असे संकेत दिले आहे.