माझी आई असती तर तिनेही त्यांच्या मदतीला धावून जाण्यास सांगितलं असतं – अर्जुन कपूर

0

मुंबई : श्रीदेवी यांचं २४ फेब्रुवारी रोजी दुबईत अकस्मात निधन झालं. त्यांच्या फॅमिलीसाठी आणि बॉलीवूडसाठी हा खूप मोठा धक्का होता. त्यावेळी बोनी कपूरच्या पहिल्या पत्नीचा मुलगा अर्थात श्रीदेवी हीच सार्वत्रपुत्र अर्जुन कपूर भारतात होता. अर्जुन आणि श्रीदेवी यांच्यामध्ये तसं फारसं सलोख्याचं नातं नव्हतं. पण त्यावेळी स्वत:ला सावरत कशाप्रकारे कुटुंबीयांना साथ दिली हे अर्जुनने सांगितलं.

क्षणभरात सर्व गोष्टी बदलतात. तो क्षण मी अनुभवला. माझ्या शत्रूंवरही कधी अशी वेळ येऊ नये. बहीण अन्शुला आणि मी शक्य तेवढी मदत केली. त्यावेळी आम्हालाही जवळच्या व्यक्तींची गरज होती. पण आमच्यासोबत कोणीच नव्हतं आणि याचा अर्थ असा नाही की जान्हवी- खुशीसोबतही कोणीच नसावं. माझी आई असती तर तिनेही सर्वांत आधी त्यांच्या मदतीला धावून जाण्यास आम्हाला सांगितलं असतं. असे अर्जुनने ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये सांगितलं.

वडिलांसोबत दुबईत जाऊन तिथल्या सर्व कायदेशीर बाबी त्याने पूर्ण केल्या आणि इथे आल्यानंतर संपूर्ण कुटुंबाच्या पाठीशी अर्जुन खंबीरपणे उभा आहे.