माझी तंदुरुस्त 100 टक्के असल्यास खेळणार कोहली

0

धर्मशाळा । येथे होणार्‍या चौथ्या व अंतिम कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली खेळणार की नाही अजुन स्पष्ट झाले नाही. तिसर्‍या कसोटी सामन्यात विराटच्या खांद्याला जबर मार लागला होता.त्यामुळे चौथ्या कसोटीत तो खेळणार की नाही यावर प्रश्‍न उभे राहिले आहे. याबद्दल विराट कोहली म्हणला की, माझी तंदुस्ती 100 टक्के असल्यास तर मी खेळणार आहे.

विराट कोहलीने आपले खेळणे फिटनेसवर अवलंबून असल्याचे सांगितल्याने त्याची खेळण्याची शक्यता फार कमी आहे. कारण ऑस्ट्रेलिया विरुद्ध रांची येथे झालेल्या तिसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना विराटच्या खांद्याला दुखापत झाली होती. यानंतर विराट तिस-या कसोटी सामन्यातही खेळणार नाही अशी शक्यता व्यक्त केली जात होती. दुखापतीमुळे चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या खेळण्यावर साशंकता व्यक्त केली जात आहे.