मुंबई-बॉलीवूडमधील नामांकित चित्रपट निर्माता राजकुमार हिरानी यांच्यावर एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. मागीलवर्षी येऊन गेलेल्या ‘संजू’या चित्रपटामध्ये सहायक दिग्दर्शिका म्हणून काम केलेल्या महिलेने हा आरोप केला आहे. कालपासून राजकुमार हिरानी यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान राजकुमार हिरानी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी हा सगळा प्रयत्न माझी प्रतीमा मलीन करण्यासाठी होत असल्याचे सांगितले आहे.
संबंधित बातमी-राजकुमार हिरानी यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप !
राजकुमार हिरानी यांनी केलेल्या कृत्याची माहिती पीडित महिलेने ‘संजू’चे सहनिर्माते विधू विनोद चोप्रा यांना मेलद्वारे दिली होती. याशिवाय विधू यांची पत्नी अनुपमा चोप्रा, कथा लेखक अभिजात जोशी, विधू यांची बहीण आणि संचालिका शेली चोप्रा यांनादेखील तिने मेल केला होता. काल याप्रकरणी राजकुमार हिरानींच्या वकिलांनी प्रतिक्रिया दिली होती. हिरानी यांच्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे वकील आनंद देसाई यांनी म्हटले होते.