मुंबई – मुंबईचे महापौर आयोजित जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त ‘माझी मुंबई’ या विषयाला अनुसरुन बृहन्मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने ०८ जानेवारी रोजी बृहन्मुंबई क्षेत्रातील सर्व महापालिका शाळा तसेच खासगी अनुदानित व विना अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी बालचित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते व मुंबईचे महापौर प्रिं.विश्वनाथ महाडेश्वर, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार, ०५ एप्रिल, रोजी दुपारी ३.०० वाजता दिनानाथ मंगेशकर नाटयगृह, विलेपार्ले (पूर्व), येथे आयोजित करण्यात आला आहे.
या स्पर्धेत ५८,१४६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल मुंबईचे महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर यांनी २३ मार्च, रोजी एक पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला होता. जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मागील आठ वर्षांपासून ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित भव्य अशी महापौर आयोजित बालचित्रकला स्पर्धा घेतली जाते. स्पर्धेतील विजेत्यांची निवड परीक्षकांमार्फत करण्यात येते. सन २०१६-१७ या वर्षांत आयोजित बालचित्रकला स्पर्धेत ५८,१४६ बालचित्रकारांनी सहभाग नोंदविला होता.शिक्षण समितीच्या अध्यक्षा शुभदा गुढेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱया पारितोषिक वितरण समारंभाला भा.ज.यु.मो. च्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा स्थानिक खासदार पुनम महाजन,स्थानिक आमदार पराग अळवणी, उप महापौर हेमांगी वरळीकर, महापालिका आयुक्त अजोय मेहता, सभागृह नेते यशवंत जाधव,स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर, स्थानिक नगरसेविका ज्योती अळवणी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महापालिका उप आयुक्त (शिक्षण) मिलिन सावंत व शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी केले आहे.