‘माझी सिटी, स्मार्ट सिटी’ विषयावर निबंध स्पर्धा

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर भाजप शिक्षक आघाडीच्या वतीने ’माझी सिटी, स्मार्ट सिटी’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी 31 ऑगस्ट अखेरपर्यंत निबंध सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निबंधामध्ये आपले शहर ’स्मार्ट’ होण्यासाठी आवश्यक असणार्‍या बाबींचा उल्लेख व उपाययोजना नमूद करणे आवश्यक आहे. निबंध मराठी, हिंदी, इंग्रजी यापैकी कोणत्याही एका भाषेत लिहावा. ही स्पर्धा दोन गटात होणार आहे. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना स्मृतीचिन्ह व रोख बक्षीस दिले जाणार आहे. प्रथम क्रमांकास एक हजार, द्वितीय क्रमांकास सातशे तर तृतीय क्रमांकाला पाचशे रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

याठिकाणी सादर करावेत निबंध
निबंध लिखित स्वरुपात संत तुकारामनगर येथील भारतीय जैन संघटना प्राथमिक विद्यालय, आळंदी-भोसरी रोडवरील श्रमजीव विद्यालय, सांगवीतील नृसिंह विद्यालय, चिंचवडगावातील क्रांतिवीर चापेकर विद्यालय, थेरगावातील धाईंजे व कासारवाडीतील ज्ञानराज विद्यालयात 31 ऑगस्ट अखेरपर्यंत निबंध सादर करावेत, असे आवाहन भाजप शिक्षक आघाडीचे शहराध्यक्ष संजय शेंडगे यांनी केले आहे.