माझे एन्काऊंटर करण्याचे षडयंत्र-तोगडिया

0

अहमदाबाद । वृत्तसंस्था । देशात हिंदूंचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करण्यात येत असून माझे एन्काऊंटर करण्याचे षडयंत्र रचण्याच आले असल्याचा गंभीर आरोप विश्‍व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडीया यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

प्रवीण तोगडिया हे १२ तास गायब झाल्याने खळबळ उडाली होती. ते बेशुध्दावस्थेत आढळून आल्यावर त्यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, आज सकाळी अहमदाबाद येथे पत्रकार परिषदेत प्रवीण तोगडीया यांनी या प्रकरणाची पूर्ण माहिती दिली. ते म्हणाले की, राजस्थान पोलीस माझ्याकडे अजामीनपात्र वॉरंट घेऊन येत असल्याची माहिती मला मिळाली. मी या प्रकरणी न्यायालयात शरणागती पत्करण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी ऑटो घेऊन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर काय झाले ते आपल्याला समजले नाही असे तोगडिया म्हणाले. या प्रकरणी गुजरात व राजस्थान सरकार मिळून माझे एन्काऊंटर करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप तोगडिया यांनी केला. सर्वात महत्वाची बाब म्हणजे आयबी ही केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आपल्याला धमकावत असल्यासा आरोपदेखील त्यांनी केला. तोगडिया यांच्या आरोपांमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.