‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम राबवण्याकरिता महापालिकेनेही कसली कंबर

65-70 टिमची घोषणा करण्यात येणार , आयुक्तांची जनशक्तीला माहिती.

जळगाव – कोविड-19 प्रादुर्भाव रोखणे व मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्ह्यात 28 एप्रिल ते दिनांक 2 मे या कालावधीत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत कुटुंबांचे सर्वेक्षण मोहिम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले होते. हि योजना राबवण्याकरिता महापालिकेनेही कंबर कसली असून बुधवारी महापालिकेच्या वतीने 65-70 टिमची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती मनापा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी जनशक्तीशी बोलताना दिली.

आज जाहीर होणार तपासणी संघ
महापालिका प्रशासनातर्फे बुधवारी 65 ते 70 तपासणी संघाची घोषणा करण्यात येणार आहे. ज्यात प्रामुख्याने शिक्षक,आरोग्य सेवक/सेविका व मनपा कर्मचारी अशी तीन जण मिळून नोंदणीची काम करतील. साधारणता एका संघात दोन ते तीन व्यक्तींचा समावेश असणार आहे. ज्यांकडून शहरात किती बाधित किंवा कोरोनाची लक्षणे असणारे नागरिक आहेत हे समजणार आहे.

जास्तीत जास्त कोरोनाबाधितांपर्यंत पोहोचणे गरजेचे.
शहरात केल्या जाणारा या सर्वेक्षणातून जास्तीत जास्त कोरोना बधीतापर्यंत पोहोचता येणार आहे. यावेळी नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. ज्यात नागरिकांना कोणतेही लक्षणे आहे का? त्यांना सर्दी खोकला ताप असं काही त्रास होत आहेत का? त्याची तपासणी केली जाणार आहे. याच बरोबर नागरिकांचे टेम्परेचर व ऑक्सिजन चेक करण्यात येणार आहे. यामुळे जास्तीत जास्त नागरिकां पर्यंत पोहोचायला मनपा प्रशासनाला मदत होणार असून याचा थेट फायदा हा शासनाच्या त्रिसूत्री कार्यक्रमाला होणार आहे.

पहिल्या टप्या कारगर ठरली मोहीम
कोविडचा विषाणूच्या प्रादुर्भाव झालेल्या बाधित रुग्णांचे लवकर निदान झाल्यास त्यांच्यावर लवकर उपचार करून रुग्णांचे प्राण वाचविता येते. तसेच त्यांचे विलगीकरण केल्यामुळे त्यांच्यापासून इतर व्यक्तींना होणारा संसर्गसुध्दा टाळता येतो.ड़ड़ कोविड-19 विषाणूच्या पहिल्या लाटेमध्ये ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत घरोघरी जावून कुटुंबाचे सर्वेक्षण केले होते. या मोहिमेमुळे जिल्ह्यात व शहरात लक्षणे असलेले व बाधित रुग्ण शोधण्यात मदत झाली होती. परिणामी पहिल्या टप्प्यातील साथ आटोक्यात आणण्यास या मोहिमेचा प्रभावी उपयोग झाला आहे