“माझे सरकार पाडून दाखवाच”; उद्धव ठाकरेंचे खुले आव्हान

0

मुंबई: महाविकास आघाडीत मतभेद दिसून येत असल्याने हे सरकार फारकाळ टिकणार नाही असे बोलले जात आहे. भाजपकडून सरकार पडण्याचे प्रयत्न होतील अशीही चर्चा आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझे सरकार पाडून दाखवाच” असे खुले आव्हान त्यांनी भाजपला दिले आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी त्यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा टीझर आज संजय राऊत याई ट्वीटरवर पोस्ट केला आहे. यात उद्धव ठाकरे यांना सरकार पडण्याबाबत चर्चा सुरु असल्यावर प्रश्न विचारले असता त्यांनी “मी बसलेलोच आहे, माझी मुलाखत सुरु असतानाचा सरकार पाडा” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला आव्हान दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीनंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. शरद पवार यांच्या मुलाखतीत अनेक राजकीय किस्से उलगडले आता मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मुलाखतीतही अनेक राजकीय किस्से उलगडणार आहे. लवकरच संपूर्ण मुलाखत प्रसिद्ध होणार आहे.

वयाच्या साठीला मला मुख्यमंत्री पद मिळाले आहे, त्यासाठी हट्टाहास होता असे नाही, हा योगायोग आहे. राज्यात तीन चाकी सरकार असल्याचे आरोप होतात, मग केंद्रात किती चाकाचे सरकार आहे असा प्रतिप्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला आहे.