नवी दिल्ली – भारतीय बॅंकांना हजारो कोटींचा चूना लावून परदेशात फरार झालेला व्यावसायिक विजय माल्ल्या याने आपल्यावरील कारवाई चुकीची असून भाजपावर निशाणा साधला आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी एका मुलाखतीत विजय माल्ल्याकडून सर्व वसूली करण्यात आली असल्याचे सांगितले आहे तरीही भाजप नेते माझ्याविरोधात का बोलत आहे? असा प्रश्न विजय माल्ल्याने उपस्थित केला. आज ट्विटरवरून त्याने भाजप नेत्यांवर टीका केली आहे.
एका मुलाखतीत पंतप्रधान मोदी विजय माल्ल्याने बँकांचे 9 हजार करोड घेऊन फरार झाले असले तरी त्यांच्या केंद्र सरकारने माल्ल्या यांची 14 हजार करोड रुपये संपत्ती जप्त केली आहे असे सांगितल्याचा दावा माल्ल्याने केला आहे. यापुढे ट्विटमध्ये विजय माल्ल्याने सांगितले की, भारताने मला पोस्टर बॉय बनवले आहे. जेवढे माझ्यावर कर्ज होते त्यापेक्षा अधिक वसूली माझ्याकडून सरकारने केली आहे. 1992 पासून मी युकेमध्ये राहत असतांना मला फरार म्हणणे भाजपाला योग्य वाटते.
काही दिवसांपूर्वी विजय माल्ल्याने सरकारी बँकांनी माझ्याकडे पैसै घ्यावेत आणि आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजला वाचवावे, अशी ऑफर दिली होती. जेट एअरवेज कंपनी आर्थिक अडचणीत असून कंपनीचे चेअरमन नरेश गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर माल्ल्याने ट्विट केले होते.