जयपुर। राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा काल शेवटचा दिवस होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुमेरपुर येथे मतदारांना संबोधित केले. यावेळी त्यांनी ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर घोटाळ्यात ज्यांनी भ्रष्ट्राचार केला. त्यांना पकडण्याचे काम मी नाही तर तुम्ही दिलेल्या मतदानाने केले आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
ख्रिश्चियन मिशेल याला अटक करण्यात आली आहे. आता या घोटाळ्यात कोण-कोण सहभागी होते, त्यांची नावे समोर येतील. हे प्रकरण कुठपर्यंत जाते हे येणारा काळच सांगेल असा टोलाही मोदींनी लगावला.
२०१४ मध्ये जर तुम्ही मला पंतप्रधान केले नसते तर भ्रष्ट्राचारी पकडले गेले नसते. तुमच्या मतामुळे भ्रष्ट्राचारी पकडले गेले असे मोदींनी सांगितले.