माझ्याविरुद्धचा हा राजकीय कट : नगरसेवक कुलभूषण पाटील

0

गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन असल्यामुळे मी माझ्या घरीच आहे. सोशल मीडियात फिरत असणाऱ्या जुगाराच्या बातमीशी माझ्या काही एक संबंध नाही. न्यूज पोर्टलवर बातमी प्रसिद्ध झाल्यावर मला याविषयी माहिती मिळाली. यात मला जाणीवपूर्वक अडकवण्यात येत आहे. केवळ त्या वार्डाचा नगरसेवक असल्याने राजकीय विरोधकांकडून सदरची खोटी माहिती पसरवण्यात आली आहे.