माझ्या जीवाला भाजपपासून धोखा: तेजबहादूर यादव

0

नवी दिल्लीः नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसी मध्ये उभे असलेले माजी बीएसएफ जवान तेज बहादूर यादव सोशल मीडिया वर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, भाजपा माझ्या हत्येचा कट रचत आहे. तत्पूर्वी तेजबहादूर यादवाचा एक कथित व्हिडीओ समोर आला होता. त्या व्हिडीओ मध्ये 50 कोटी रुपये दिले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठार करेन, असं त्या व्हिडीओ क्लिपमध्ये तेज प्रताप यादव बोलताना दिसत आहे

https://www.facebook.com/itejbahaduryadav/videos/2303647313182104/

परंतु त्या व्हिडीओच्या सत्यतेची अद्याप खातरजमा झालेली नाही. दोन वर्षांपूर्वीचा व्हिडीओ एडिट करून मला बदनाम करण्याचं षड्यंत्र रचलं जातंय. माजी बीएसएफ जवान तेज बहादूरनं यादव यांनी फेसबुक लाइव्ह करत म्हणाले, भाजपाला वाटतंय की, मोदींना पूर्वांचल मधून हार मिळू शकते. मोदींचा पराभव होईल, त्यामुळेच भाजपानं हे नवं षड्यंत्र रचलं आहे. तेज बहाद्दूर यांची उमेदवारीच नाट्यमय घडामोडीनंतर रद्द करण्यात आली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळण्यासाठी लढाई लढणार असल्याचे तेज बहादूर यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाने मागितलेले सर्व पुरावे आम्ही दाखल केले आहे, तरीही माझी उमेदवारी रद्द करण्यात आल्याचे तेजबहादूर यांनी म्हटले आहे.तेज बहादूर यांची उमेदवारी रद्द केल्यामुळे सपा-बसपाच्या गोटातही खळबळ उडाली आहे.