मुंबई : मराठी अभिनेता सुबोध भावे याची भेट घालून देतो असं सांगून चाहत्यांकडून पैसे उकळले जात असल्याचा प्रकारसुरु आहे. स्वत: सुबोधनं आपल्या फेसबुक पोस्टद्वारे या संदर्भात माहिती देत चाहत्यांना सतर्क केलं आहे.
‘मला भेटवण्यासाठी कोणी पैसे किंवा अन्य मागणी करत असेल तर अशा कोणावरही विश्वास ठेऊ नका’ असं सुबोधनं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहित चाहत्यांना सतर्क केलं आहे. ‘माझा सख्खा भाऊ “सूनीत ” सोडून “भावे” आडनाव लावणारा माझा कोणीही भाऊ नाही त्यामुळे माझ्या नावे कोणी पैसे उकळत असेल तर त्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका’ असं सुबोधनं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.