माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला गेला-विराट कोहली

0

मुंबई। भारतीय संघाचा कर्णधार कोहली याने आपण कांगारूच्या खेळांडूबाबत केलेल्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला गेला असल्याचे म्हटले आहे. आपली अजूनही कांगारूच्या खेळाडूबरोबर चांगली मैत्री आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत कागारूच्या 2-1 पराभव केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केला. आपण आता कांगारूच्या खेळाडूंना मित्र मानत नाही असे म्हटले होते.

यानंतर त्याच्यावर कांगारूच्या मीडियाने प्रचंड टिका केली होती.मालिकेत विजय मिळवल्यानंतर आता स्टीव्ह स्मिथ आणि ऑस्ट्रेलियन संघासोबत मैत्रीची नवी सुरूवात करणार का ? असे विचारले असता नाही ’आता आधीसारखे काही राहिले नाहीये, मीही आधी असाच विचार करायचो पण आता सर्व बदलले आहे. पहिल्या कसोटीनंतर मी जे बोललो होतो त्याबाबत मी पूर्णत: चुकीचा सिद्ध झालो. खेळाच्या वातावरणात तुम्हाला प्रतिस्पर्धी म्हणून खेळायचे असते, पण मी चुकीचा ठरलो. पहिल्या कसोटीनंतर मी जे बोललो होतो तसं पुन्हा बोलताना तुम्ही मला पाहणार नाही’, असं कोहली बोलला होता.