जळगाव । मी घडलो, आयुक्त पदापर्यंतचा जो सुखद प्रवास झाला त्यात या महाविद्यालय व संस्थेचे योगदान फार मोलाचे असल्याचे प्रतिपादन आयुक्त जीवन सोनवणे यांनी केले. ते जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्था व आयुक्त जीवन सोनवणे यांचे 1977 ते 79 बॅचचे वर्गमित्र नुतन मराठा महाविद्यालयातील मित्रांनी संयुक्तरित्या सेवापूर्ती गौरव समारंभात बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र आण्णा पाटील हे होते़ प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, प्राचार्य डॉ. एल. एस. राणे, प्राचार्य डॉ. एल़. पी़. देशमुख, मनोहर पाटील, डी. डी. पाटील, कृष्णा साळुंखे, विकास पवार, कल्पना पाटील, मंगला पाटील, मिनल पाटील, डॉ.सचिन पाटील, नगरसेवक संदेश भोईटे, अश्विनी देशमुख, दुर्गेश पाटील, ज्योती चव्हाण, गायत्री शिंदे हे उपस्थीत होते.
आयुक्त सोनवणे यांनी यावेळी आपले आईवडिल यांच्याबद्दलही कृतज्ञता भावना व्यक्त केल्यात. तसेच जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर हे माझे मार्गदर्शक होते. आणि आतापर्यंत जी सेवा झाली त्यात ते माझ्या पाठिशी उभे होते असेही सोनवणे यांनी स्पष्ट केले. आयुक्त सोनवणे यांचा सपत्नीक सत्कार आयोजन समितीच्यावतीने करण्यात आला़ योगायोग आज आयुक्त सोनवणे यांचा वाढदिवस असल्याने केक कापून तो साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या मिनल पाटील, प्रा. डॉ. संध्या सोनवणे, डॉ. शालिनी सोनवणे, प्रा. डॉ. उर्मिला पाटील उपस्थीत होते़ सूत्रसंचालन प्रा. जयप्रकाश महाडीक यांनी तर आभार संस्थेचे संचालक भरत पाटील यांनी मानले.