‘माझ्या हातात काहीही नाही’; ओला-उबेर चालकांच्या प्रश्नावरून मंत्री रावते चिडले

0

मुंबई- विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले आहेत. दरम्यान ओला-उबेर चालकांचा संप सुरु आहे. याच विषयावरून राष्ट्रवादीच्या आमदार विद्याताई चव्हाण यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावतेंना थांबवून ओला-उबर चालकांच्या प्रश्नाबाबत जाब विचारला आहे.

दिवाळीची डेडलाइन उलटून गेल्यानंतरही अद्याप ओला, उबेर चालाकांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी संप पुकारला आहे. या संपामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे हाल होत असल्याचे सांगत विद्याताईंनी रावतेंना धारेवर धरले. त्यानंतर रावतेंनीही चिडून विद्याताईंना उत्तर दिले. प्रवासासाठी लोकल, बस, मेट्रोसह इतर पर्याय उपलब्ध आहेत. हा वाद न्यायालयात असून, माझ्या हातात काहीही नाही, असे म्हणत रावते तिथून निघून गेले. सरकारने ओला, उबर चालकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील 30 हजार ओला, उबर टॅक्सीचालक आणि मालक संघटना संपावर गेल्या आहे. त्यामुळे प्रवाशांना याचा त्रास होत आहे.