पाचोरा । दिवसेंदिवस पर्यावरणाचा र्हास होत चालला आहे. पर्यावरणाचा र्हास रोखण्यासाठी पाचोरा येथील जयकिरण प्रभाजी नागरी सकहारी संस्थेने प्रत्येक वर्षी तालुक्यातील तिन गाव दत्तक घेऊन “माझ गाव हिरव गाव” ही संकल्पनांचा माध्यमातून तिन वर्ष झाडे लाऊन जगवणार्या गावांना सुमारे पन्नास हजार ते एक लाख रुपये बक्षीस देवून गौरव करण्याचा एक ऐतिहासीक ठराव संस्थेचे चेअरमन अॅड.अतुल संघवी यांनी मांडून तो बहूमताने मंजूर करण्यात आला आहे. वार्षिक सभेस संस्थेचे व्हाईस चेअरमन ठखर पाटील, ज्येष्ठ संचालक डॉ. मनोज पाटील, दिपक संघवी, अॅड. आण्णासाहेब देशमुख, प्रमोद बांठीया, शिवाजी आव्हाड, अमित संघवी, व्यवस्थापक पारसमल बोथरा, डॉ.शांताराम भोसले, अॅड.प्रशांत कुलकर्णी, राजेश जैन, अर्जुन नामदेव पाटील, प्रितमसिंग पाटील, दिलीप बांठीयां, गोवर्धन खंडेलवाल, रविंद्र पाटील, शिवाजी पाटील, विवेक पाटील, शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते.
संस्थेस 79 लाखाचा नफा
शहरातील प्रत्येक वर्षी प्रगतीचा आलेख उंचावणारी जयकिरण प्रभाजी पतसंस्था ही एकमेव संस्था असून या संस्थेस यावर्षी 79 लक्ष रुपये नफा झाला आहे. संस्था सभासदांना 12 टक्के लाभांशाचे वाटप करणे, सभासद पाल्यांचा सत्कार घडवून आणणे व यावर्षापासून सभासद पाल्यांना उच्य शिक्षणासाठी बिनव्याजी शैक्षणिक लोन देणे आशा योजना सुरु झाल्या आहे. सभासदास प्रथम कन्यारत्न झाले असेल तर त्या कनेच्या नावावर पाच हजार रुपयांची फिक्स डिपॉझिट ठेवणे, सभासदांना अपघाती विमा लागु करणे पर्यावरणाचा र्हास थांबविण्यासाठी दर वर्षी तालुक्यातील तिन गावांची निवड करुन त्या गावांना 500 झाडांची रोपे पुरवीने ती गावे तिन वर्षा झाडे लावून जगवतील त्या गावांना पन्नास हजार ते एक लाखांच्या रोख रक्कम स्वरुपात बक्षीस देणे यासारख्या विविध सामाजिक बांधीलकी जपणारे उपक्रम राबवित आहेत.